आलिंगन, चुंबन, शृंगार,
हस्तमैथून,
कामक्रीडा..
चमकलात ना
? किती सावरून बसतो आपण 'असलं' काही वाचताना! विशेषत: मराठीत असे शब्द
बहुदा
जरा जास्तच खटकतात. Sex, foreplay, intercourse, ejaculation, orgasm
त्यातल्यात्यात
ऐकायला
बरे वाटतात
.
इव्ह एन्सलर यांच्या 'The Vagina Monologues' या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव मराठीत कसं वाटेल? भाषांतर करुन पहा. अवघडल्यासारखं होईल उच्चारतांना, नाही का?
(बाय द वे, तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर जरुर वाचा.
इव्ह
यांच्या धाडस व चिकाटीला आणि पतीने त्यांना दिलेल्या पाठींब्याला अभिवादन!
)
'काय
,
चाललंय काय नेमकं?'
हा प्रश्न
एव्हाना
तुमच्या मनात पिंगा घालत असेल.
तु
मच्यापैकी काहीजणांनी
इकडे-तिकडे पाहिलं
ही
असेल
.
'
कुणी
बघतंय
का
मला मी हे वाचतांना
'
? कदाचित
सुरुवातीच्या
काही ओळी नजरेआड सरकवून हे
वाक्य
वाचत असाल तुम्ही.
होतं असं
,
नका मनावर घेऊ
. पण हे बोलायलाच हवं.
लक्षात आहे
ना
आपलं
काय ठरलंय
? जन्म आणि मृ
त्यू
या दरम्यान जे जे घडतं त्या सगळ्याबद्दल बोलायचं.
आडपडदा न ठेवता.
अगदी
मोकळेपणानी.
प्रत्येक जन्म, ज्या
'
क्रिये
'
बद्दल
सर्वसाधारणपणे
आपण
उघड बोलायचं टाळतो, त्याशिवाय होऊच शकत नाही. वनस्प
तीं
च्या
जगतात असो
किंवा पक्षी-
प्रा
ण्यांच्या दुनियेत
, जन्म
'
त्या
'
घटनेविना असंभव आहे. इतकी महत्वाची गोष्ट दडवून कसं चालेल बरं?
आपण मात्र कटाक्षाने तिचा उल्लेख टाळतो. इतका, की जणुकाही आपण त्या गावचेच नाही!
मला वाटतं फार आधीच
या विषया
चा
बाऊ करणं
आपण
सोडायला हवं होतं. तशी कृती घडली असती तर अनेक विकृतींपासून
कदाचित आपला समाज
वाचू शक
ला
अस
ता
. जर-तर निरर्थक आहे.
पण
अजूनही वेळ गेलेली नाही.
म्हणतात ना, 'कधीच न होण्यापेक्षा उशीर बरा'.
निदान आता तरी कुठलंही कारण पुढे न करता याचा सर्वांगीण विचार करायला हवा. काही चुका झाल्याच असतील तर त्या मान्य करून सुधारायला हव्यात. विचारांती योग्य ते स्विकारायला हवं, अयोग्य ते नाकारायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्वीकारलं ते लगेच आचरणात आणायला हवं जेणेकरुन जी झळ
आपण
सोसली किंवा सोसतोय ती भावी पिढयांच्या नशिबी नसावी.
तुम्हाला काय वाटतं?
अनेकदा आपल्याला सत्य माहित असतं पण ते मान्य करण्याची आपली तयारी नसते, खरं ना? आता ह्या मालकाबद्दल ऐका. तो आपल्या कामगारांना खोचक प्रश्न विचारण्याकरता प्रसिध्द होता. ''प्रणय म्हणजे शंभर टक्के सुख, पन्नास टक्के सुख-
पन्नास टक्के
श्रम की
शंभर टक्के
श्रम
?''
एका चुणचुणीत तरुणाला त्यानं
एकदा विचार
लं.
''
शंभर टक्के सुख
,'' तरुण क्षणार्धात उत्तरला. ''इतक्या छातीठोकपणे तू हे कसं म्हणू शकतोस? तुझं तर अजून लग्नही झालेलं नाही,'' मालकानं विचारलं. ''साहेब, त्यात अर्धा टक्का जरी श्रम असते तरी त्यासाठी तुम्ही मला कामाला जुंपलं असतं!'' मिस्किल हास्य करत तरुण उद्गारला.
खरं आहे त्याचं म्हणणं. आपण आपल्या तब्येतीची देखभाल करायला डॉक्टरची सेवा घेतो, मिळकतीची व्यवस्था ठेवायला सीएला पाचारण करतो व स्वप्नातील घराला मूर्त रुप देण्यासाठी आर्किटेक्टची मदत मागतो. इतकंच नव्हे, काहीजण तर त्या घरातील देवांची काळजी घ्यायला पुजारी नेमतात!
थोडक्यात, शक्य तितक्या गोष्टी 'आउट-सोअर्स' करण्याकडे आपला कल असतो. असं जरी असलं तरी आपल्या ऐवजी कोणीही जेवण्यासाठी, झोप घेण्यासाठी
अथवा प्रेम करण्यासाठी इतर कुणाला
नेमल्याचं ऐकीवात नाही. का असं? कारण जीवनाला, अस्तित्वाला पायाभूत या गोष्टी आहेत. आहार निद्रा भय मैथूनंच… मनुष्य आणि इतर
प्राण्यांमध्ये
हे साधर्म्य आहे
.
भुकेची जाणीव आणि पोट भरल्यानंतरची तृप्ती, आरामाची गरज आणि पुरेशा विश्रांती
नंतरचा तजेला, भय वाटणं अथवा न वाटणं आणि शरीरसुखाची कामना ह्या उपजत प्रेरणा आहेत. आपली नैसर्गिक प्रवृत्ती आपण स्वतः अनुभवण्याची बाब आहे. त्याचप्रमाणे त्यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाही. असं असतांना आहार, निद्रा व भय यांना एक न्याय आणि मैथूनाला दुसरा ही दांभिकता आहे, नाही का?
मला वाटतं, जितक्या मोकळेपणानी आपण पहिल्या तीन बाबींबद्दल बोलतो तितक्याच सहजतेने चौथीबद्दल बोललं जावं. या चारहींचा समान व शास्त्रशुद्ध विचार व्हावा. त्याहून महत्वाचं म्हणजे तो नुसताच विचार न राहता कृतीत यावा. अगदी लहानपणापासुन हे सत्य सगळ्यांना समजावं म्हणजे वयात येतांना कुणालाही शारीरिक आकर्षण वा शरीरसुखाची कामना
म्हणजे 'अपराध' किंवा 'पाप' ही बोचणी असणार नाही. हे भूक आणि झोप याइतकं सहज आहे ही भावना रुजेल आणि जीवन जास्त साधं, सोपं, सरळ होईल. तुम्हाला काय वाटतं?
थांबा. लगेच उत्तराची जुळवा-जुळव करु नका. लैंगिकता, फ्री-सेक्स, स्वैराचार आणि तत्सम विचारांचा मी समर्थक नाही
!
आहार, निद्रा, भय आणि मैथून मनुष्य व इतर प्राण्यांत समान आहेत हा पुर्वार्ध झाला. उत्तरार्ध असा आहे की
बुध्दी
आपल्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. तिचा वापर करायचा की
बुध्दी
विहीन राहून पशु
सारखं
वागायचं हा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असतो. आपण सगळ्यांनी
बुध्दी
वापरण्याचा निर्णय घेतला आहे म्हणूनच आपण हे बोलतोय.
मला वाटतं की मैथुनावरील
शास्त्रशुद्ध ज्ञानाला,
चर्चेला
, समस्यांना
आपल्या जीवनात योग्य ते स्थान
मि
ळावं.
कुठल्याही गोष्टीची अतिरेक योग्य नाही हे आपण सगळेच जाणतो. अत्याहार करणं किंवा भूक मारणं, अती झोपणं वा झोप टाळून शरीराला शिणवणं आणि सतत कसलंतरी भय बाळगणं अथवा अतिसाहस दाखवणं या पैकी कशाचंही समर्थन आपण करणार नाही. प्रत्येक वेळी समतोल सांभाळावा असंच आपण म्हणू.
जो नियम इतर सगळ्याला तो
सेक्स
साठी
का असू नये?
या
सहज प्रवृत्तीला
कायम
खालचा
दर्जा का?
ही
उपजत प्रेरणा
दडपण्याची गरज काय? भूक
मारणं
, झोप
टाळणं
याइतकेच
ह्या
भावने
चे दमन करण्याचे परीणाम चांगले
नसतात
.
आपण हे अनेकवेळा ऐकलं आहे, आजुबाजुला घडताना पाहिलं आहे, पाहतोय. आता
सावध होण्याची वेळ
आली आहे.
वर उल्लेख केलेल्या
चारही प्रवृत्तींना समानतेने स्विकारण्याची आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याची
नितांत
गरज आहे.
सुरुवात आपल्या कुटुंबापासून करू या. समाज म्हणजे कुटुंबांची समष्टीच ना?
तुम्हाला काय वाटतं?
तुमचं मत जरुर कळवा. मी वाट पाहतोय. माझा पत्ता: chandravel.foundation@ gmail.com आणखी एक कराल? जर हे सगळं पटत असेल तर किमान एका व्यक्तीला सांगा. करणार ना एवढं?
तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!
- चंद्रशेखर वेलणकर
================
जाता जाता…
भाऊसाहेब पाटणकर यांचं नाव ऐकलंय? ते विदर्भातील यवतमाळचे. मराठी शायरी रुजवण्याचं आणि त्या साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवुन देण्याचं काम त्यांनी केलं. प्रेम, वार्धक्य, मृत्यू, तत्त्वज्ञान अश्या अनेक विषयांवरील त्यांच्या रचना वाचनीय आहेत. प्रस्तुत विषयावरील काही ओळी वाचा. आवडतील तुम्हाला.
वैराग्यही सन्मानिले अन शृंगारही सन्मानिला,
अंकावरी आहे रतीच्या सिद्ध येथे झोपला;
विसरला दुनीयेस अपुल्या गुंजनाही
विसरला
;
कमलकोशी भृंग आता कमलासही त्या
विसरला;
हे हवे वैराग्य आम्हा, निष्कामता ऐसी हवी;
तैसी नको नुसतीच जेथे, दाढी हवी लुंगी हवी!
('जाता जाता…' साठी तुमच्या जवळ काही सांगण्यासारखं असेल तर सुमारे शंभर शब्दांत पाठवा)
Really well said and put sir. Good somebody is talking about the hush-hush things loudly.
ReplyDeleteTwo years ago when I had written a book, there was a chapter on sex education written by sexpert Dr Mahinder Watsa in it and many people advised me to remove it. It was shocking but knowledge is important.
Thanks for your comment Kanchan. It's high time our psyche changed. I received a few messages and calls for this post. These people preferred texting or calling to coming on record here!! This underscores the need for talking openly about the subject and spreading scientific knowledge about it
ReplyDeleteसगळीच मतं मला पटली अशातला भाग नाही. कारण लैंगिक विषय मुक्तपणे बोलले गेले किंवा चर्चा झाली तरच त्यातली विकृती किंवा कलुषित झालेलं वातावरण कमी होईल असं नाही. त्या परिस्थितीसाठी हे मौन जबाबदार आहे असं वाटत नाही.
ReplyDeleteकारण १ म्हणजे, काही विषय समजण्यासाठी जसं थोडं शहाणपण लागतं, त्यातीलच हा विषय आहे. उदा- मोबाईलचे परिणाम, त्याच्या वापराचे धोके, फायदे सगळं माहित असून, कळूनसुद्धा आपण आज ज्या पद्धतीने स्मार्टफोनच्या आहारी गेलेले पाहतो ह्याला उत्तर नाही. इंटरनेटची ओळख केवळ फेसबुकपुरती होत असेल, तर त्याचा उपयोग नाही, काही गोष्टींना एक वय अपेक्षित आहे किंवा तेवढी समज आवश्यक आहे. ती नसल्यास ह्या ज्ञानाचा उपयोग होईलच ह्याची खात्री वाटत नाही.
कारण २ म्हणजे, समाजातल्य़ा सतत चालणाऱ्या गोष्टींचा माणसावर परिणाम होत असतो. उदा- समलिंगी संबंधांमधल्या चर्चा, त्याला मान्यता द्यावी ह्यासाठीचे प्रयत्न अशा अनेक बाबींमुळे समाजस्वास्थ्याला आवश्यक किंवा पोषक नसलेली गोष्ट माणसांवर ठसते. आणि तीच बाब समलिंगी संबंध नसलेल्या माणसांनाही शिवून जाते. त्याविषयी आकर्षण किंवा कुतूहल वाटू शकतं. की जे माझ्यामते, योग्य नाही. समाजातील काही गोष्टी अनुल्लेखाने वगळता आल्या पाहिजेत.
जरी फ्रॉइडसारखं सगळं रतिसुखाला किंवा कामक्रीडेशी जोडावं एवढं ते महत्त्वाचं आहे का?
म्हणजे, समाजात काही एका प्रमाणापर्यंत बारबालांचीसुद्धा आवश्यकता आहे हे मला समजू शकतं, पण त्यावर सूज्ञपणे तोडगा काढला गेला तप उत्तम. पण एवढा समाज-मन किंवा सामुहिक-मन प्रगल्भ नसतं.
ह्रतिक रोशनचा किंवा शाहरुखचा पिक्चर गरी बाघताना आपण टाळया वाजवत नाही., पण थिएटरमध्ये १०० जण एकत्र आले की तशी इच्छा होते आणि टाळ्या वाजवाव्याशा, ओरडावसं वाटतं.
हेच, लैंगिक विषयाच्या उघड चर्चेमुळे होऊ शकतं असं वाटतं. अज्ञान नक्की नसावं, किंवा त्यातले धोके, चुका समजाव्यात पण मुक्त चर्चेनेच हे सिद्ध होईल असे नाही. नवरा-बायको इतपत जग मर्यादित असेल, किंवा आई-वडिलांशी तेवढा मोकळा संवाद असेल तर हे प्रश्न घरीच सुटू शकतील.
इथे थोडीशी गल्लत होतेय असं मला वाटतं. लैंगिक विषय मुक्तपणे बोलले गेले किंवा चर्चा झाली तरच त्यातली विकृती किंवा कलुषित झालेलं वातावरण कमी होईल असं मी म्हणत नाहीये. एक स्वस्थ जीवन जगताना आहार, निद्रा, भय याप्रमाणेच मैथुनाचा शास्त्रोक्त विचार रुजावा. या चारही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, शरीराशी निगडीत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान न केल्यास जे विकार उद्भवतील ते somatopsychic स्वरुपाचे असतील.
Delete१. ही नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळे ती 'समजण्याकरता' काहीच करावं लागत नाही आणि इथेच मुद्दा येतो तो योग्य ते ज्ञान देऊन/घेऊन सुजाण करण्याचा/ होण्याचा. मोबाईलच्या , फेसबुकच्या आहारी जाणे किंवा आणखी कशाचाही 'आहारी' जाणे हा मनाचा भाग झाला. तो पूर्णतः psychic विषय आहे. शरीर बिचारं त्यात स्वतः येत नाही. आणि तरीही psychosomatic समस्यांमुळे त्याचे परीणाम भोगतं! ज्ञानाचा योग्य उपयोग करायलाच बुद्धी मिळाली आहे आपल्याला पण तू म्हणतेस तसं तिचा वापर करताना कमी लोक दिसतात. अगदी अपेक्षीत वय गाठल्यावर सुद्धा!
२. समाजातल्य़ा सतत चालणाऱ्या गोष्टींचा माणसावर परिणाम होत असतो हे अगदी खरं आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्याच्या संधी मर्यादीत होत्या. आता इंटरनेट मुळे शास्त्रीय ज्ञान काय किंवा अशास्त्रीय ज्ञान काय, दोन्ही मिळणं नको तितकं सोपं झालंय. परिणामतःअनुल्लेखाने समाजातील काही गोष्टी वगळणं पूर्वी कधीही नव्हतं इतकं कठीण झालंय. यामुळे सुज्ञपणे तोडगा काढणं खरंच खूप आवश्यक झालंय. लैंगिक विषयाची सतत उघड चर्चा व्हावी असं मी कुठे म्हटलंय? तारतम्य राखावच लागणार. मला एव्हढंच म्हणायचं की आहार, निद्रा आणि भय यासोबत योग्य ते स्थान मैथुनावरील चर्चेला आणि शास्त्रशुद्ध ज्ञानाला मिळावं जेणेकरून 'नवरा-बायको' होईपर्यंत जीवन निकोप व्हावं. चुकीच्या मार्गाने चुकीचं ज्ञान मिळवण्याची गरज वयात येताना भासू नये. आणि खरं आहे, योग्य parenting असेल तर हे प्रश्न उद्भवणारच नाहीत.
गौरी, मोकळेपणानी मत मांडल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
या विषयावर अलीकडे बरीच जागरूकता लेख, पुस्तकं, सिनेमे (मराठी सुद्धा) यांच्या माध्यमातून होतेय. मला असं वाटतं कि या विषयाच्या बाबतीत दोन टोकाच्या भूमिका घेणं नुकसानकारक आहे. लैंगिक सुख/लैंगिक शिक्षण यांची बिलकुल चर्चा/जागृती नं करणं हे जसं घातक तसंच आधुनिकतेच्या नावाखाली उठसूट उहापोह करणं हे सुद्धा तितकंच नुकसानकारक. त्यामुळे हा विषय हाताळताना योग्य तो समतोल बाळगावा लागेल. या विषयाची चर्चा करतांना context खूप महत्वाचा आहे. उदाहरणार्थ युरोपात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या स्त्रीला जर एखाद्या पुरुषाने "तुजे केस खूप सुंदर आहेत, किवा तू सुंदर दिसतेयस" असं म्हटलं तर ती स्त्री एक निखळ compliment म्हणून त्याला धन्यवाद देईल पण हेच जर भारतातल्या खेडेगावात एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला म्हटलं तर त्यातून मारामारी होण्याची शक्यता आहे.
ReplyDeleteया विषयाची बिलकुल चर्चा/जागृती न करणं याचे अनेक दुष्परिणाम आपला समाज भोगतो आहे. अजूनही स्त्री आणि पुरुषांना समान लैंगिक हक्क नाहीत. लग्न झालेल्या अनेक बायकांवर त्यांचे नवरे अप्रत्यक्षपणे बलात्कार करतात (संमतीशिवाय संबंध). दरवर्षी भारतात बलात्काराच्या २४००० अधिकृत तक्रारी येतात, तक्रार न नोंदवलेले जवळपास वर्षाला १ लाख असतात. वर्षाला दीड कोटी स्त्री गर्भाची हत्या होते. पुरुषप्रधान संस्कृती, भारतीय context ला अनुरूप लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि स्त्रियांना दुय्यम स्थान ही कारणं असू शकतील. सिनेमा हे माध्यम सुद्धा स्त्री-पुरुष प्रतिमा तयार करतं. उदाहरणार्थ शोभेची बाहुली असणारी कमजोर हिरोईन किवा आयटम सॉंग मध्ये नाचणारी थिल्लर मुलगी असंच चित्रण बहुतांश भारतीय सिनेमात असतं. मुलांना आणि मुलीना तेच पहायची आणि स्वीकारायची सवय होते. त्याउलट अमेरिकेतल्या सिनेमात हिरो आणि हीरोईन दोघेही तितकेच सशक्त आणि कर्तुत्ववान दाखवलेले असतात. अमेरिकेत वावरताना पदोपदी स्त्री-पुरुष समानता पाहायला मिळते. स्त्रियांना कधीही दुय्यम किवा कमजोर मानत नाहीत. अनेक स्त्रिया स्वतःच्या कर्तुत्वावर उच्च पदावर निर्भीडपणे काम करताना आणि स्वतःचं स्वतंत्र, स्वावलंबी अस्तित्व जपताना दिसतात.
या विषयाचा अति गवगवासुद्धा विकृती आणि बाजारीकरणाला जन्म देऊ शकतो. याची अनेक उदाहरणं विविध देशात पाहायला मिळतात.
या विषयावर एक चांगला लेख मागे वाचला होता. तो लेख इथे वाचता येईल: (http://www.loksatta.com/chaturang-news/sexual-satisfaction-is-needed-40206/)
निखिल वेलणकर
अगदी बरोबर. ही काय अथवा ती काय, extreme कुठलीही योग्य नाही. हा विषय हाताळताना योग्य तो समतोल बाळगावाचं लागेल.
Deleteतू म्हणतोयस ते खरं आहे. भारतीय context ला अनुरूप लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि स्त्रियांना दुय्यम स्थान आपली शोकांतिका आहे. त्यातील दुर्दैवी भाग असा की स्त्री गर्भाची हत्या, सुनेला होणारा जाच आणि मुलाला आणि मुलीला कुटुंबात दिली जाणारी असमान वागणूक यामध्ये अनेकदा स्र्त्रीयाच पुढाकार घेताना दिसतात.
भारतातील सिनेमा या बद्दल न बोललेलंच बरं! काही गोष्टी आपल्या नियंत्रण कक्षेत असतात, काही नसतात. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत त्यावर त्वरेने काम करण्याची गरज आहे. या तसेच अन्य ज्वलंत विषयांवर अलीकडे बरीच जागरूकता लेख, पुस्तकं, सिनेमे यांच्या माध्यमातून होतेय ही बाब दिलासा देणारी आहे.