१. तुम्ही शारीरिक व्यायाम करता?
अ. दररोज ब. आठवडयातून तीन-चार दिवस क. व्यायाम?????? वेळ कुठे आहे????
२. तुम्हाला आवडणारा खेळ तुम्ही खेळता…
अ. दर रविवारी ब. महिन्यातून एक-दोनदा क. ऑफिस/ क्लब इत्यादी वार्षिक कार्यक्रमात
३. घरी/ऑफिसला लिफ्ट ऐवजी जिना वापरता?
अ. बहुतेकदा ब. उतरताना क. वेड लागलंय का? राहणं सहाव्या मजल्यावर; ऑफिस दहाव्या
४. कामातून वेळ काढून जाणीवपूर्वक हालचाल/स्ट्रेचेस करता?
अ. आठवणीनं ब. माहित आहे महत्व पण जमत नाही क. वेड लागलंय? वेळ कुठे असतो?
५. डॉक्टरकडे जाण्याची फ्रीक्वेन्सी काय आहे?
अ. काही तक्रार असेल तर ब. रेग्युलर चेक-अप असतो क. शक्यतोवर टाळतो/टाळते
अ- ०४; ब- ०२, क- ०१
तुम्हाला वीस पैकी वीस गुण मिळाले असतील तर मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही पुढं वाचलं नाही तरी चालेल कारण तुमचं चांगलं चाललंय. पण मला खात्री आहे तुम्ही वाचणार कारण जागरूक असल्यामुळेच तुमचं चांगलं चाललंय! बारा ते अठरा दरम्यान तुमचा स्कोअर असेल तर तो वीस करायला खालील माहिती प्रोत्साहन देईल. सहा ते अकरा दरम्यान तुम्ही असाल तर कंबर कसा आणि सहा महिन्यात डीस्टींक्शन क्लास पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. मात्र स्कोअर शुन्य ते पाच असेल तर तातडीनं हालचाल करायला हवी. तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरु करा.
शरीर आणि मनःस्वास्थ्य यांपैकी आधी फिजिकल फिटनेस बद्दल आपण बोलू. उघड आहे, एका दमात ते करणं शक्य नाही; योग्यही नाही. आपला उद्देश निव्वळ चर्चा करणं नसून पटलेल्या गोष्टी जीवनात सामावून जीवन जास्त जिवंत करण्याचा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे करता येतील अशा बदलांबद्दल इथे बोलू आणि नंतर व्यायाम, प्राणायाम आणि आहार यांची पुढील तीन भागांत चर्चा करू.
हल्ली व्यवहारी असण्याला बरच महत्व प्राप्त झालंय. 'You
need to think practically' असा सल्ला देतांना मी अनेकांना अनेकवेळा ऐकलंय. 'Wise
investment', 'optimum output', 'cool comforts' इत्यादींचं महत्व मी नाकारत नाही. मला इतकंच म्हणायचंय की वैद्यकीय सुविधांचे दर आकाशाला भिडत असण्याच्या या काळात शरीरस्वास्थ्य एक उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. उदाहरणार्थ, हार्ट बायपास मी टाळू शकलो तर काही लाख रुपये मी निश्चितपणे वाचवतो. वरीलप्रमाणे सल्ला देणाऱ्या लोकांना 'Money
saved is money earned' हे सुद्धा माहित असायला हरकत नसावी.
मला वाटतं, प्रश्न केवळ पैशांचा नाही. व्याधींबरोबर येणारा शारीरिक त्रास, मनस्ताप, आप्तजनांची होणारी ओढाताण याचं मोल करता येतं? नाहीच करता येत. फिजिकल फिटनेस एक अमुल्य ठेवा आहे मित्र-मैत्रिणींनो. तुम्हाला काय वाटतं?
सुरुवात आपण दैनंदिन जीवनात काही सहज-सोपे बदल घडवून आणून करू शकतो.
१. मान्य आहे मला, आजच्या धकाधकीच्या युगात रोज व्यायामासाठी वेळ देणं अनेकांना शक्य नसतं. पण ते होऊच शकत नाही हे मला अमान्य आहे. सात पैकी निदान तीन-चार दिवस तरी व्यायाम होऊ शकतो. बरं, दोन दिवस- शनिवार आणि रविवार? एवढं तर नक्कीच शक्य आहे. वेळ काढावा लागेल. काही लाख कमी मिळतील पण काही लाख वाचतील सुद्धा. आणि त्या मोल न करता येणाऱ्या गोष्टी? त्यांचीही गरज भासणार नाही. एकूण काय, आजच्या भाषेत नियमित व्यायाम चांगला 'इन्सेन्टीव्ह', 'विन-विन सिचुएशन' आहे. वाट कसली पाहायची मग?
२. कम ऑन, क्रिकेट आवडत नाही तुम्हाला? ठीक आहे. फुटबॉल? टेनिस? बॅडमिन्टन? गोल्फ? काही तर आवडत असेल. नाही, स्नूकर नाही, प्लीज! जमलं तर दर रविवारी आणि नाहीच जमलं तसं तर महिन्यातून दोन-तीनवेळा तरी खेळा ना तुमच्या आवडीचा खेळ.
३. मी स्वतः लिफ्ट वापरत नाही. मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि माझं ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे. रोज निदान २०० वेळा पायऱ्या चढणं उतरणं होतं. तुम्ही सहाव्या मजल्यावर राहात असाल आणि ऑफिस दहाव्या मजल्यावर असेल तरी जिनाच वापरत जा असं म्हणायला मी वेडा नाहीये! पण मधला मार्ग काढता येतोच ना? ठरवून टाका तीन मजल्यांपर्यंत लिफ्ट वापरायची नाही. तीन मजले चढा आणि मग लिफ्टमध्ये शिरा. लिफ्ट फक्त इव्हन नंबरला थांबत असेल तर सुरुवातीला दोन मजले चढा आणि ते सवयीचं झालं म्हणजे चार मजले चढून लिफ्ट पकडा!
४. ऑफिस योगा, डोळ्यांचे व्यायाम शिकून घ्या. न पेक्षा किमान जाणीवपूर्वक हालचाल करा. तास-दोन तासांनी आठवणीनं पाय मोकळे करा, स्ट्रेचेस-बेन्ड्स करा. एखादा मजला चढून-उतरून या. आपण परफॉर्मर असल्यावर इतका ली-वे नक्कीच मिळतो.
५. डॉक्टरकडे जाण्यात जसा कमीपणा नाही तसंच भूषण सुद्धा नाही. आवश्यक तेंव्हा वैद्यकीय मदत घ्यायलाच हवी. तसंच वेळो-वेळी स्वतः काही बाबींवर नजर ठेवणं चांगलं. विशिष्ठ वयानंतर चार-सहा महिन्यातून एकदा बी.पी., ब्लडशुगर, कॉलेस्टरॉल तपासून घ्यायला काय जातं? काहीच नाही.
या पाच पासून सुरुवात करणं पुरेसं आहे. लवकरच त्यातून आनंद मिळायला लागेल कारण त्यात आनंद आहेच.
एक महत्वाची गोष्ट.
हे सगळं करूनही शारीरिक तक्रारी असणारे काही लोक भेटतील आपल्याला. पण ते अपवाद असतात नियम नाही. त्या लोकांच्या बाबतीत तसं झालं म्हणून हे सगळं करणं व्यर्थ आहे असा निष्कर्ष काढणं अयोग्य आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नागपूरला असतांना माझ्या मित्राच्या एका नातेवाईकाला हार्ट ट्रबल होता. डॉक्टरांनी त्यांना सकाळी फिरायला जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो मानलाही. काही दिवसांनंतर सकाळी फिरायला गेले असता एका अपघातात ते दगावले. मला वाटतं, या दुर्दैवी घटनेचा ठपका मॉर्निंग वॉक वर ठेवणं योग्य नाही. तुम्हाला काय वाटतं?
-चंद्रशेखर वेलणकर
chandravel.foundation@gmail.com
I scored 13 and I totally agree with you Shekhar!
ReplyDeleteThanks.. Keep it up Suyog.. Godspeed to you to get to 90 pc from 65 pc, which is already first class..
ReplyDeleteGot an sms from a friend asking me my score.. I thought I should share it here as well.. It's 18... 4, 2, 4, 4, 4...
ReplyDeleteIt is true what you insist upon.
ReplyDeleteShariram Adya Khalu Dharmam : to take care of body is the first duty.
We usually start taking care of body at very late age. Until then the body becomes so stressful, the mind becomes so scattered that all your efforts go futile. A half an hour daily for exercise is more than enough. A couple of Surya namaskar, Kapalbhati pranayam and a bit of meditation should be the sequence.
I suffered from Colitis for more than 3 years. Underwent all sort of medication but no luck. Diagnostic reports said everything was normal. I was psychologically disturbed as well as physically stagnated.
I started doing surya namaskar, Kapalbhati pranayam and meditation and lo! I started regaining my health again. I am still on the path of recovering and it has increased my confidence.
Mens sana in corpore sano or in our way; Sar salamat toh pagdi pachas!!!
Taking care of your body and mind on preference level from your busy schedule is not a guilt creating crime. If you don't start now, you lose a lot.
For those who have problem with surya namaskar should do Kapalbhati pranayam at least. It keeps your stomach healthy. It saves from many diseases.
mine score in 18 too, Shekhar sir :) 4+2+4+4+4
Thanks for sharing your first-hand experience Yogesh. You've put it aptly; just half an hour day can keep a doctor away! Along with Kapalbhati, Anuloma-Viloma also helps greatly. Needless to say, must be learnt under experts' eyes..
ReplyDeleteAnd yes, a good score.. :-) Let's keep the tempo going...
Interesting will try this all :)
ReplyDelete